रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित – Lokmat.com


Lokmat Business
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 08:43 IST2026-01-12T08:43:33+5:302026-01-12T08:43:59+5:30
मुंबई: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘गीगा फॅक्टरी’ स्वप्नाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. चीनमधील कंपन्यांकडून आवश्यक असलेले बॅटरी तंत्रज्ञान मिळवण्यात अपयश आल्याने रिलायन्सने भारतात लिथियम-आयन बॅटरी सेल बनवण्याचा आपला प्लॅन सध्या थांबवला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमधील जामनगर येथे मोठ्या प्रमाणावर लिथियम-आयन सेल निर्मितीचा प्रकल्प उभारणार होती. यासाठी कंपनी जागतिक स्तरावर तंत्रज्ञान भागीदाराच्या शोधात होती. प्रगत लिथियम-आयन तंत्रज्ञानामध्ये चीनचे वर्चस्व असल्याने रिलायन्सने काही चिनी कंपन्यांशी बोलणी सुरू केली होती. मात्र, भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण राजनैतिक संबंधांमुळे तसेच महत्वाचे तंत्रज्ञान बाहेर न जाऊ देण्याच्या भूमिकेमुळे हा प्रकल्प अडकला आहे. चीनने काही विशिष्ट क्षेत्रांतील आपले प्रगत तंत्रज्ञान देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत.
रिलायन्स या वर्षापासून बॅटरी सेलचे उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत होती. यासाठी चिनी कंपनी ‘झियामेन हिथियम एनर्जी स्टोरेज टेक्नॉलॉजी’कडून तंत्रज्ञान परवाना घेण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा आता फिस्कटली असून चिनी कंपनीने या भागीदारीतून माघार घेतली आहे.
या अडचणीनंतर रिलायन्सने आता आपले लक्ष ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम’कडे वळवले आहे. कंपनी आता स्वतःच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज साठवण्यासाठी यंत्रणा उभारण्यावर भर देणार आहे. रिलायन्सने २०२१ मध्ये हरित ऊर्जा क्षेत्रात १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
6 hours ago
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
23 hours ago
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
2 days ago
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
3 days ago
जगातील सर्वात 'बलाढ्य' विरुद्ध सर्वात 'कमकुवत' चलन; यांच्यासमोर अमेरिकी डॉलरही फिका
4 days ago
₹३,०००, ₹५,०००, ₹८,००० आणि ₹१०,००० च्या गुंतवणुकीवर किती रिटर्न? १५ वर्षांत किती जमेल फंड, जाणून घ्या
4 days ago
होम लोन घेताय? व्याजाच्या दरापेक्षा 'हे' ८ छुपे चार्जेस ठरू शकतात महाग; दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान
4 days ago
टाटाच्या या दिग्गज कंपनीची धमाल! गुंतवणूकदारांना केलं मालामाल, रेखा झुनझुनवालांची संपत्ती झटक्यात 890 कोटी पार!
4 days ago
घरबसल्या कमाईची संधी, वर्षाच्या सुरुवातीपासून करा तयारी; पगारासोबत मिळवा अतिरिक्त 'Income'
4 days ago
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दिग्गज कोण? सीतारामन आता कोणत्या स्थानी?
5 days ago
कल्याण ज्वेलर्सचे ३ आठवड्यात ३१,००० कोटी रुपये पाण्यात; अखेर खरं कारण आलं समोर
21st Jan'25
Namita Thapar यांनी आपल्या मराठमोळ्या भाषणानं जिंकली मनं… Namita Thapar Marathi Speech
15th Feb'24
Tata Takes Over Bisleri :रिलायन्स,नेस्लेला मागे टाकत टाटाने मारली बाजी, बिस्लेरी ब्रँड टाटा समूहाकडे
25th Nov'22
सामान्य नागरिकांना अर्थसंकल्पाबद्दल काय वाटत आहे? Common People Expectations From The Budget 2021
2nd Feb'21
जुन्या गाड्या भंगारात जाणार | Auto Sector in Budget 2021 | FM Nirmala Sitharaman | India News
1st Feb'21
स्टार्टअपसाठी बूस्टअप नाहीच | No Startup Booster In Budget 2021 | FM Nirmala Sitharaman | India News
1st Feb'21
Live – Union Budget2021 Of India | अर्थसंकल्पातून काय मिळाले?
1st Feb'21
LIVE – Union Budget 2021 | FM Nirmala Sitharaman अर्थसंकल्प सादर करताना थेट प्रक्षेपण
1st Feb'21
पहा काय झालंय स्वस्त – काय महाग? Union Budget 2021-22 | FM Nirmala Sitharaman | India News
1st Feb'21
करदात्यांना काय मिळालं? #Budget2021 | FM Nirmala Sitharaman | What did the Taxpayers Get?
1st Feb'21
Copyright © 2026 Lokmat Media Pvt Ltd

source